Type Here to Get Search Results !

व्हिसाच्या नवीन नियमांमुळे अमेरिकेत शिकायला जाणं भारतीयांसाठी अवघड होईल का?


 अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.


विद्यार्थ्यांना अमेरिकेतल्या अमेरिकत युनिव्हर्सिटी कधी बदलता येईल, F1 म्हणजे स्टुडंट व्हिसावर असलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत किती काळ राहता येईल, याविषयीच्या नियमांमध्ये अमेरिकेच्या 'डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्योरिटी'ने बदल प्रस्तावित केले आहेत.


नेमके कोणते बदल प्रस्तावित आहेत? त्याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल? ते पाहूयात.

काय असतील नवे बदल?

इतर देशांतून आलेल्या विद्यार्थ्यांकडून होत असलेला 'व्हिसा अब्यूज्' म्हणजे व्हिसाचा गैरवापर थांबवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने नवे नियमांचा प्रस्ताव मांडला असल्याचं होमलँड सिक्युरिटीने म्हटलंय.


अमेरिकेत शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना F1 व्हिसा तर एक्स्चेंज प्रोग्रामद्वारे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना J1 व्हिसा दिला जा

आतापर्यंत या विद्यार्थी व्हिसांसाठी 'ड्यूरेशन ऑफ स्टेटस' नावाची एक संकल्पना वापरली जात होती.


म्हणजे जो पर्यंत एखादा विद्यार्थी अमेरिकेत एखादा फुल टाईम कोर्स करतोय त्याचा स्टेटस 'Student' आहे आणि व्हिसाचे सगळे नियम पाळतोय, तोवर त्यांना अमेरिकेत राहता येतं.


हीच 'ड्यूरेशन ऑफ स्टेटस' सिस्टीम बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय.


विद्यार्थ्यांचा व्हिसा कालावधी 4 वर्षांपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. यानंतरही त्या विद्यार्थ्याला अमेरिकेत रहायचं असेल तर 'ड्यूरेशन ऑफ स्टेटस'कडे मुदतवाढीचा अर्ज करावा लागेल.


नाही तर मग या विद्यार्थ्यांना अमेरिकेतून बाहेर पडून मग पुन्हा व्हिसासाठी अर्ज करावा लागेल.

म्हणजेच बॅचलर डिग्री करून मग पुढे मास्टर्स वा पीएचडी करण्याचा विचार असणाऱ्यांना त्यांच्या दर कोर्सच्या आधी नव्याने व्हिसा प्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे.


अमेरिकेत शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे अंडरग्रॅज्यूएट विद्यार्थ्यांना एका विद्यापीठात अ‍ॅडमिशन घेऊन गेल्यानंतर लगेचच दुसऱ्या विद्यापीठात ट्रान्सफर होता येणार नाही. तर पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतरच F-1 व्हिसावरच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या युनिव्हर्सिटीत जाता येईल.


तर ग्रॅज्युएट स्टुडंट्सना अमेरिकेत दाखल झाल्यानंतर प्रोग्राम म्हणजे ते ज्या कोर्ससाठी गेले आहेत त्यामध्ये वा विद्यापीठात बदल करताच येणार नाही. व्हिसा देताना त्यांच्या I-20 फॉर्मवर असणाऱ्या जागीच त्यांना जावं लागेल.

शिवाय एकाच शैक्षणिक पातळीवरच्या अनेक डिग्रीज घेणं आता सोपं नसेल. म्हणजे अमेरिका न सोडता, नवीन व्हिसासाठी अप्लाय न करता, एका विषयातल्या मास्टर्स नंतर दुसऱ्यातला मास्टर्स प्रोग्राम एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने करता येणार नाही.


आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे OPT किंवा ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे या ट्रेनिंग नंतर असणारा कालावधी कमी करण्यात आला आहे.


ओपीटी पूर्ण केल्यानंतरही या विद्यार्थ्यांना अमेरिकेत 60 दिवस राहता यायचं. तो कालावधी आता 30 दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव आहे.


तर लँग्वेज स्टडी म्हणजे भाषाविषयक कोर्सेससाठी 24 महिनेच मिळतील.

Post a Comment

0 Comments