Type Here to Get Search Results !

"पवारांचा कैवारी" गणेशोत्सवाला ८० वर्षांची परंपरा


घाटकोपर (प.) चिरागनगर येथे श्री. मुक्ततराज लक्ष्मण पवार यांच्या घरी “पवारांचा कैवारी” नावाने घरगुती गणेशोत्सव गेल्या ८० वर्षांपासून अखंडपणे साजरा होत आहे. या सोहळ्याला परंपरा आणि भक्तीची सुंदर सांगड लाभली आहे.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे स्वामी समर्थ रुपी गणेश मूर्तीचे विराजमान होणे. या अद्वितीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी 



भाविक उत्साहाने भेट देत असून, गणराय आणि स्वामी समर्थ यांच्या आशिर्वादाचा लाभ घेत आहेत.

सलग आठ दशके ही परंपरा जपत पवार कुटुंबीय गणेशोत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व जोपासत आहेत. या घरगुती गणेशोत्सवामुळे परिसर भक्तिभावाने उजळून निघाला आहे.


Post a Comment

0 Comments