उल्हासनगर (पूर्व):
आर. जी. एस. इंग्लिश हायस्कूल, इयत्ता ८ वी मधील विद्यार्थी जयदीप रवींद्र इंगळे आज आपला १३ वा वाढदिवस आनंदात साजरा करीत आहे.
जयदीपचे वडील श्री. रवींद्र इंगळे हे भारतीय नौदलात (Indian Navy) सिनिअर स्टोअर सुप्रिटेंडंट म्हणून कार्यरत असून देशसेवेतील त्यांचा आदर्श जयदीपच्या व्यक्तिमत्त्वावरही उमटलेला दिसून येतो.
बुद्धिबळ आणि क्रिकेट हे जयदीपचे आवडते छंद आहेत. खेळ व अभ्यास या दोन्हींत तो प्रगती साधत आहे. भविष्यात भारताच्या प्रशासकीय सेवेत (IAS) कार्यरत होऊन देशसेवा करणे हे त्याचे मोठे स्वप्न आहे.
शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांनी जयदीपला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
🎂🌸 "प्रिय जयदीप, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आयुष्यात सदैव यश, आरोग्य आणि आनंद लाभो." 🌸🎂

Post a Comment
0 Comments