काथोरे यांच्या घरी दीड दिवसांच्या गणेशोत्सवाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. घरगुती पातळीवर सुरू झालेला हा उत्सव परंपरा, श्रद्धा व उत्साहाने आजही तितक्याच भक्तिभावाने साजरा केला जात आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त खास सजावट व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.
मुंबई घाटकोपर मधील काथोरे कुटुंबाच्या
घरी यंदा गणेशोत्सवाला एक वेगळंच महत्त्व आहे. कारण त्यांच्या घरी दीड दिवसांचे गणपती प्रतिष्ठापित होऊन तब्बल ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
गेल्या अर्धशतकापासून काथोरे कुटुंब ही परंपरा जपत असून दरवर्षी गणरायाच्या आगमनानंतर घरात आरत्या, भजन, पूजन व प्रसादाचे आयोजन केले जाते.
यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशगंगा तारांगण सजावट करण्यात आली आहे. भाविकांसाठी आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत.
सौ. रुपाली काथोरे म्हणाल्या, “गणपती बाप्पा आमच्या घरातील प्रेरणास्थान आहेत. गेली ५० वर्षे ही परंपरा आमच्या कुटुंबाच्या श्रद्धेची ओळख बनली आहे आणि ती पुढच्या पिढ्यांपर्यंत सुरू राहील.”
गणेशोत्सवाच्या या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यामुळे काथोरे कुटुंबाबरोबरच संपूर्ण परिसरात आनंदाचा व भक्तिभावाचा माहोल आहे.

Post a Comment
0 Comments