Type Here to Get Search Results !

मराठा आंदोलक मुंबईत दाखल, आझाद मैदानावर अलोट गर्दी

 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले आहेत. आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. गणेशोत्सव आणि पावसामुळे पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी परवानगी दिली पण त्याच वेळी काही अटी देखील घातल्या आहेत. मनोज जरांगे हे थोड्याच वेळ आझाद मैदानात दाखल होतील. त्यांना केवळ एकच दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटलांना मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी उपोषणास आणि आंदोलनास मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, काही अटींवर त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान जर आंदोलकांनी या अटी व शर्तीचं उल्लंघन केल्यास किंवा कायदयाचा भंग केल्यास हे आंदोलन हे बेकायदेशीर घोषित करुन त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांना देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments